Thursday 27 June 2013



एकीकडे बीसीसीआयने चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकणा-या खेळाडूंवर पैशाच्या पाऊस पाडत उत्तराखंडमधील पूरग्रस्तांकडे पूर्णपणे दूर्लक्ष केले असताना उत्तराखंडच्या जल प्रकोपानंतर मदतीचे हात पुढे येऊ लागले असताना दिल्लीतील कचरा गोळा करणा-या चिमुड्यांनी पूरग्रस्तांना २० हजार रुपयांची मदत देऊ केली आहे. दिवसभर कचरा गोळा करुन मिळणा-या पैश्यातून दोन वेळेचे पोट भरण्याची खात्री नसतानाही महिन्याचे पाच रुपये या प्रमाणे ही मुले काही पैसे समाज कार्यासाठी देत असतात त्याच निधीतून हा पैसा उभारला गेला आहे.

दिल्ली, उत्तरप्रदेश, हरियाणा आणि मध्यप्रदेशमधील कचरा गोळा करणारी मुले 'बढते कदम' या सामाजिक उपक्रमासाठी दर महिन्याला आपल्या कमाईतील ५ रुपये देतात. याच निधीतून ते पंतप्रधान मदत निधीला २० हजार रुपयांचा डिमांड ड्राफ्ट देणार आहेत.

No comments:

Post a Comment