Sunday 30 June 2013

एका मंदिराजवळ
सकाळच्या वेळी काही गुरे चरत
असतात ...
त्यावेळी मंदिरातुन येणारे लोक
गाईला हात लावुन
नमस्कार करीत
होते ...
ते पाहुन म्हैस रेड्याला म्हणाली,
"मी मघा पासुन बघतेय, मंदिरातून
येणारे लोक
त्या गाईला हात
लावतायेत,
मला कोणीच हात लावत
नाही ... "
.
.
.
.
.
.
.
.
.
.
त्यावर रेडा म्हणाला,
"अगं, मी इथे असताना तुला हात
लावयाची कोणाची हिंमत आहे
काय ?" :-) :-D

Saturday 29 June 2013

प्रत्येक मुलगी सुंदर असते........... ­

प्रत्येक मुलगी सुंदर असते........... ­ ..
फक्त सुंदरता पाहण्याची नजर लागते.......... ­ ....
बाह्य सुंदरता हि सुंदरता नसते........... ­ . ...
आंतरिक सुंदरता मनाला खूप भावते.......... ­ ..... .
प्रत्येक मुलगी सुंदर असते........... ­ ..
कोणी कायेने सुंदर असत
े...........
कोणी मनाने सुंदर असते........... ­ .
कोणी संस्काराने सुंदरअसते...... ..... .
कोणी विचाराने सुंदर असते...........
प्रत्येक मुलगी सुंदर असते........... ­ ..
कोणाची चाल सुंदर असते........
कोणाची शरीराची ठेवण सुंदर असते...........
कोणाचे हास्य लोभावने सुंदर असते...........
कोणाचे बोलणे वेडे करणारे सुंदर असते........... ­ .
प्रत्येक मुलगी सुंदर असते........... ­ ..
कोणाचे गाणे सुंदर असते........... ­ .
कोणाचे लिखाण सुंदर असते......
कोणाचे कविता सुंदर असते........
कोणाचे वस्त्र सुंदर असते........... ­ .
प्रत्येक मुलगी सुंदर असते........... ­ ..
केवळ बाह्य रुपावरील सुंदरतेवर भुलू नका.......
मनाची सुंदरता विसरू नका............
तिच्या सुंदरतेचे मूल्यमापन तिच्या रंगावर आणि शरीराच्याभूमिती ­वर करू नका........
मनाच्या भूमितीचा अभ्यास करा.आणि सुंदरता ठरवा........... ­ ...
कारण प्रत्येक मुलगी सुंदर असते.....!!!♥

दारु चढल्यावर ची खास वाक्ये

दारु चढल्यावर ची खास वाक्ये

१. तु माझा भाउ आहे.. घाबरायच नाही.
२.भीडु आपल्याला बिलकुल चाढली नाही..
३. गाडि मी चालवणार, तु मुकाट पणे माग बसायच.
५. तु आपल्या बोलण्याच मनावर नाय घ्यायच.
६. भाउ, आपण तुला मनापासुन मान्तो. तु लै भारी
७. चल आज सुनाव त्याला.. काय होइल ते बघुन घेउ....
८. आज फक्त तिच्या बरोबर बोलायला साठी री चार्ज केला आहे....
९. तुला काय वाटत मला चढली आहे?
१०. अस समजु नको कि मी पीलोय म्हणुन बोलतो आहे...
११. अरे यार येवढी पुरेल ना, कमी नाय ना पडनार......
१२. मी लास्ट पेग बॉटम अप करणार....
१३. यार तु अजुन नको पीउ.. तेरे को चड गई है..
१४. य़ार काही म्हण तु आज तुझ बोलण मनाला लागल...
१५. कही पण आसो.. साला तु आपला भाऊ आहेस...
१६. तु बोलना भाई, काय पाहीजे जान चाहिये हाज़िर है
१७.अबे आपल्याला आज पर्यंत नाही चढली ,चल साल्या बेट लाव आज..
१८. चल बोलतो तिच्याशी तुझ्या बद्द्ल , फोने नंबर दे उस्का...
१९ य़ार आज उसकि बहुत याद आ रहि है
२०. य़ार आता बस ,आत नाही प्यायच...
२१. य़ार तु आपला सर्वात जिगरी दोस्त... आज से हमारे बीच में कोइ पोरगी नहि अयेगि

Thursday 27 June 2013

joke

डॉक्टर कडे फोन ची बेल वाजते पलीकडचा माणूस :डॉक्टर साहेब, कापूस आहे का?
डॉक्टर : हो आहे की.
पलीकडुन: थोडा काढा आणि खीशात ठेवा.
परत १० मी. फोन येतो.
पलीकडचा माणूस : डॉक्टर साहेब, कापूस आहे का?
डॉक्टर : हो आहे की.
पलीकडुन: थोडा काढा आणि खीशात ठेवा.
अस ३ ते ४ वेळा झाल्यावर डॉक्टर फ़ार चिडतो.. मनात म्हणतो आता येवू देत फोन बघतोच त्याच्याकडे.
१० मी. पुन्हा बेल वाजते…
पलीकडचा माणूस : डॉक्टर साहेब, कापूस आहे का?
डॉक्टर : जोरात ओरडतो.. नाहीये का?
पलीकडचा माणूस : आहो मग चिडता कशाला खिशातला काढा की।

हे प्रेम म्हणजे नक्की काय असत...

हे प्रेम म्हणजे
नक्की काय असत...
कुणी तरी सांगाल
का हे प्रेम म्हणजे
नक्की काय असत...
कशाला म्हणतात प्रेम...
कोणाचीतरी सतत
आठवण येण हे प्रेम असत...
दिवसरात्र त्याचा
विचार करण हे प्रेम असत....
येणार नाही माहित असुनही
त्याच्या फ़ोनची वाट पाहन
हे प्रेम असत...
की तो नाही म्हणुन
गर्दीतही एकाकी वाटन
हे प्रेम असत....
फेसबुक वर सारख
त्याच्या प्रोफाइल ला भेट देणे ...
त्याचा नंबर डायल करून
रिंग वाजन्याआधी फोन
कट करण याला प्रेम म्हणतात...
मी बोलणारच नाही
त्याच्याशी ठरवूनही ...
फ़ोन नाही तर नाही...
पण निदान एक मिस कॉलची
अपेक्षा करण याला प्रेम म्हणतात...
की त्याला गरज नाही
तर मी तरी का भाव देऊ
अस म्हणुनही त्याच्या एका सॉरी ने क्षणात विरघलुन जाण
याला प्रेम म्हणतात...
त्याच्या एक नजरेसाठी व्याकुळ
होण याला प्रेम म्हणतात...
त्याच्या मिठीसाठी आतुरण
याला प्रेम म्हणतात...
त्याच्यासाठी वाटनार्या काळजिला
प्रेम म्हणतात की
त्या ख़ास मैत्रीला प्रेम म्हणतात...
त्याच्या जगात आपल स्थान नाही माहित असुनही त्याच्या बरोबर
स्वप्न रंगवन याला प्रेम म्हणतात...
स्वताच्याही नकळत त्याच्यात
गुंतत जाण याला प्रेम म्हणतात...
प्रेम म्हणजे प्रेम
म्हणचे प्रेम असत


एकीकडे बीसीसीआयने चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकणा-या खेळाडूंवर पैशाच्या पाऊस पाडत उत्तराखंडमधील पूरग्रस्तांकडे पूर्णपणे दूर्लक्ष केले असताना उत्तराखंडच्या जल प्रकोपानंतर मदतीचे हात पुढे येऊ लागले असताना दिल्लीतील कचरा गोळा करणा-या चिमुड्यांनी पूरग्रस्तांना २० हजार रुपयांची मदत देऊ केली आहे. दिवसभर कचरा गोळा करुन मिळणा-या पैश्यातून दोन वेळेचे पोट भरण्याची खात्री नसतानाही महिन्याचे पाच रुपये या प्रमाणे ही मुले काही पैसे समाज कार्यासाठी देत असतात त्याच निधीतून हा पैसा उभारला गेला आहे.

दिल्ली, उत्तरप्रदेश, हरियाणा आणि मध्यप्रदेशमधील कचरा गोळा करणारी मुले 'बढते कदम' या सामाजिक उपक्रमासाठी दर महिन्याला आपल्या कमाईतील ५ रुपये देतात. याच निधीतून ते पंतप्रधान मदत निधीला २० हजार रुपयांचा डिमांड ड्राफ्ट देणार आहेत.

Wednesday 26 June 2013

असं असतं प्रेम?

असं असतं प्रेम?

एका डॉक्‍टरांकडे एक ८०-८५ वर्षांचे म्हातारे गृहस्थ आपल्या जखमेचे टाके काढून घ्यायला गेले. सकाळी ८.३० चा सुमार. ते डॉक्‍टरांना म्हणाले, थोडं लवकर होईल का काम? मला ९ वाजता एकीकडे जायचंय. डॉक्‍टरांसमोर त्या क्षणी काहीच काम नव्हतं. त्यांनी जखम तपासली, सामानाची जमवाजमवकेली आणि टाके काढायची तयारी केली. दरम्यान, ते त्या गृहस्थाशी गप्पा मारत होते.
“”आजोबा, ९ वाजता दुसऱ्या डॉक्‍टरांची अपॉइंटमेंट आहे का?”
“”नाही! मला ९ वाजता माझ्याबायकोबरोबर नाश्‍ता करायला दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये जायचंय.”
“”हॉस्पिटलमध्ये? आजारी आहेत का त्या?”
“”हो! गेली पाच वर्षे हॉस्पिटलमध्येच आहे ती.”
“”अच्छा! आणि तुम्ही वेळेवर गेला नाहीत, तर वाट पाहतील ना त्या? काळजीही करतील…?”
“”नाही डॉक्‍टर. तिला “अल्झायमर्स’ झालाय. ती गेली पाच वर्षे कोणालाच ओळखत नाही.” आजोबा शांतपणेम्हणाले.
डॉक्‍टर चकित होऊन म्हणाले, “”आणि तरीही तुम्ही रोज त्यांच्याबरोबर नाश्‍ता करायला इतक्‍या वेळेवर आणि धडपडून जाता? त्या तुम्हाला ओळखतही नसताना?”
त्यावर पुनः तितक्‍याच शांतपणे म्हातारे गृहस्थ म्हणाले, “”डॉक्‍टर ती मला ओळखत नसली, तरी मी तिला गेली कित्येक वर्षे ओळखतो. माझी बायको आहे ती, आणि माझं जिवापाड प्रेम आहे तिच्यावर.”
ऐकता ऐकता डॉक्‍टरांच्या अंगावर रोमांच उभे राहिले. गळा दाटून आला. त्यांच्या मनात आलं, “”हे खरं प्रेम; प्रमे म्हणजे काही नुसतं घेणं नव्हे, तर त्याबरोबर कितीतरी देणं, निरपेक्षपणे स्वतःकडचा आनंद लुटवणं, उधळणं – त्या गृहस्थांसारखं.”
अचानक इंटरनेटवरून आलेल्या अनेक संदेशांमधला एक संदेश डॉक्‍टरांना आठवला-
“”चांगल्या लोकांच्या वाट्याला नेहेमीच सगळं सर्वोत्तम येतं असं नाही –पण जे वाट्याला येतं त्यातलं सर्वोत्तम शोधून ते आयुष्य साजरं करतात.”
यालाच आयुष्य म्हणायचं. आपल्या माणसाला आहे तसं स्वीकारणं आणि आपल्या दोन्ही हातांनी, आपल्या सर्वस्वाने त्याच्यावर प्रेमाचा वर्षाव करणं….
खरंच मिळेल असं प्रेम आपल्याला अन्‌ जमेल का असं प्रेम करणं आपल्याला?…